Wednesday, November 27, 2024

बार बेंडिंग शेड्यूल (Bar Bending Schedule) चे मूलभूत सूत्रे आणि त्याचा वापर/ Important formula

 

बार बेंडिंग शेड्यूल (BBS) चे मूलभूत सूत्रे आणि त्याचा वापर

बार बेंडिंग शेड्यूल म्हणजे लोखंडी बार्सची लांबी, आकार, वजन आणि त्यांचा प्रकार याची सूची तयार करण्याची एक पद्धत. यामुळे स्ट्रक्चरल कॉम्पोनन्टमध्ये लागणाऱ्या स्टीलचं अचूक प्रमाण आणि त्याची आवश्यकता सोप्या पद्धतीने समजते. बार बेंडिंग शेड्यूल बांधकाम क्षेत्रातील महत्त्वाचा भाग आहे, जो वेळ आणि खर्च वाचवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो.

चला तर मग, बार बेंडिंग शेड्यूल तयार करण्यासाठी लागणाऱ्या काही मूलभूत सूत्रांवर एक नजर टाकूया.


1. बारची लांबी मोजण्याचे सूत्र (Length of Bar)

बारच्या लांबीचे गणित हे रेखाटनामध्ये दिलेल्या मोजमापांवर आधारित असते.

L = (Clear Span) + (Development Length) + (Hook Length)

  • Clear Span: म्हणजे मुख्य कॉम्पोनन्टमधील मोकळे अंतर.
  • Development Length (Ld): बारचा मजबूत धरून ठेवण्यासाठी लागणारी लांबी.
  • Hook Length: बारच्या टोकाला तयार केलेल्या हुकची लांबी.

2. वजने मोजण्यासाठी सूत्र (Weight of Bar)

बारच्या वजनासाठी एक साधे सूत्र वापरले जाते:

W = (D²/162) × L

  • W: बारचे वजन (किलोमध्ये)
  • D: बारचा व्यास (मिमीमध्ये)
  • L: बारची लांबी (मीटरमध्ये)

उदाहरण:

जर 12 मिमी व्यासाचा आणि 6 मीटर लांबीचा बार असेल, तर:

W = (12²/162) × 6
W = 5.33 किलो


3. स्टिरप्ससाठी लांबीचे सूत्र (Length of Stirrup)

स्टिरप्स म्हणजे कॉलम किंवा बीममध्ये बार बांधण्यासाठी वापरले जाणारे चौकोनी किंवा आयताकृती फॉर्म.

L = 2 × (Length + Breadth) + 2 × Hook Length - Bend Deductions

  • Bend Deductions: बार वळवल्यामुळे कमी होणाऱ्या लांबीची कपात केली जाते. साधारणतः प्रत्येक 90° वळणासाठी 2d कपात केली जाते (d = बारचा व्यास).

4. बेंडचे कपात सूत्र (Bend Deduction)

बेंड करताना बारची काही लांबी कमी होते. यासाठी पुढील मानक वापरले जाते:

  • 45° Bend: 0.314 × D
  • 90° Bend: 2D
  • 135° Bend: 3D

5. हुकची लांबी (Hook Length)

हुकची लांबी मोजण्यासाठी:

Hook Length = 9D
इथे D म्हणजे बारचा व्यास आहे.


6. क्षेत्रफळ मोजण्यासाठी (Steel Requirement)

बांधकामासाठी लागणाऱ्या स्टीलचे प्रमाण (Area of Steel) मोजण्यासाठी:

A = (π/4) × D² × N

  • A: एकूण क्षेत्रफळ (mm² मध्ये)
  • D: बारचा व्यास (मिमी)
  • N: बारची संख्या

बार बेंडिंग शेड्यूल तयार करण्याचे फायदे

  1. स्ट्रक्चरल अचूकता: स्ट्रक्चरल रेखाटनामध्ये दिलेले बारचे डिटेल्स व्यवस्थित नोंदवले जातात.
  2. वेळ वाचतो: कामाच्या सुरुवातीला BBS तयार केल्यास साहित्य मोजण्यात आणि व्यवस्थापनात वेळ वाचतो.
  3. साहित्य वाचते: अचूक मोजमापांमुळे स्टीलचा अपव्यय कमी होतो.
  4. कामाच्या खर्चावर नियंत्रण: स्टीलच्या अचूक गणनेसह खर्चाचे योग्य नियोजन करता येते.

निष्कर्ष

बार बेंडिंग शेड्यूल तयार करणे ही एक महत्त्वाची पद्धत आहे जी अचूक गणिते, स्ट्रक्चरल डिझाइन समजणे, आणि वेळ वाचवण्याच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे. वरील मूलभूत सूत्रांचा उपयोग करून तुम्ही कोणत्याही प्रकारच्या स्ट्रक्चरचे बार बेंडिंग शेड्यूल तयार करू शकता.

जर तुम्हाला बार बेंडिंग शेड्यूल कसे तयार करायचे यावर प्रॅक्टिकल मार्गदर्शन हवे असेल, तर तुमच्या गरजेनुसार आम्ही विशेष मार्गदर्शन देण्यास तयार आहोत.

तुमच्या अभिप्रायासाठी कमेंट करा आणि ब्लॉग आवडला असेल तर शेअर करा!

#howtocalculatecuttinglengtinbarbendingschedule

Wednesday, October 2, 2024

बांधकाम कामगार व त्यांचे प्रकार ....

 बांधकाम कामगार हे कोणत्याही इमारतीच्या बांधकाम प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या मेहनतीमुळे संकल्पना प्रत्यक्ष बांधकामात रूपांतरित होते. बांधकाम कामगारांचे योगदान खालीलप्रमाणे असते:

  1. मजूर (Labourers):

    • मजूर हे सामान्य कामगार असतात जे बांधकाम साहित्याचे उचलणे, हलविणे, मिक्सिंग (जसे सिमेंट मिक्स करणे) आणि कामाच्या जागेवर हलकी कामे करतात.
    • इमारतीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सहाय्य करतात, जसे कि वाळू-सीमेंट मिक्सिंग, विटांची वाहतूक, आणि लहान-मोठी साफसफाईची कामे.
  2. मिस्त्री (Mason):

    • इमारतीचे बांधकाम करण्यासाठी विटा, सिमेंट, कंक्रीट यांचा वापर करून भिंती बांधणे, प्लास्टर करणे, आणि इतर स्ट्रक्चरल कामे करतात.
    • फाउंडेशनपासून (पायाभरणी) ते इमारतीच्या पूर्ण बांधकामापर्यंतचे कार्य हाताळतात.
  3. कारागीर (Skilled Workers):

    • हे विशिष्ट कौशल्य असलेले कामगार असतात, जसे की प्लंबिंग, इलेक्ट्रिकल फिटिंग, टाइल्स बसवणे, आणि गॅस फिटिंग करणे.
    • प्रत्येक कारागीर आपापल्या कामात निपुण असतो आणि बांधकामाच्या अंतिम टप्प्यांवर (फिनिशिंग) योगदान देतो.
  4. लोहार (Steel Fixer):

    • स्ट्रक्चरल स्टीलच्या रॉड्स आणि बार्सची फिटिंग करतात.
    • कॉलम, बीम, स्लॅब यांच्यासाठी स्टीलचे बांधकाम करणे.
  5. पेंटर (Painter):

    • इमारतीची अंतर्गत आणि बाह्य भिंतींना रंग देणे, डेकोरेटिव्ह पेंटिंग, पुट्टी लावणे आणि फिनिशिंग करणे.
    • इमारतीला आकर्षक आणि संरक्षित ठेवण्यासाठी पेंटचे काम करतात.
  6. सुतार (Carpenter):

    • दरवाजे, खिडक्या, फर्निचर, फॉर्मवर्क (शटरिंग) तयार करणे.
    • इमारतीच्या फिनिशिंग आणि इंटीरियर डिझाइनमध्ये योगदान.

बांधकाम कामगारांच्या विविध कौशल्यांनीच इमारत प्रत्यक्षात उभी राहते. त्यांचे काम अचूक आणि कुशलतेने झाल्याशिवाय इमारतीची गुणवत्ता सुनिश्चित करता येत नाही.

 छोट्या इमारत बांधकामात विविध व्यक्ती आणि त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. प्रत्येक व्यक्तीचे कार्य वेगळे आणि आवश्यक असते. येथे त्यांच्या योगदानाबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे:


1. Architect (वास्तुविशारद):

   - इमारतीचे संकल्पना, डिझाइन आणि लेआउट तयार करणे.

   - क्लायंटच्या आवश्यकतेनुसार डिझाइन विकसित करणे.

   - बांधकामात सौंदर्य, कार्यक्षमता आणि जागेचा योग्य वापर सुनिश्चित करणे.

   - सरकारी नियमांचे पालन आणि मंजुरीसाठी आवश्यक डिझाइनिंग करणे.

2. Structural Engineer (स्ट्रक्चरल इंजिनियर):

   - इमारतीची संरचना (structure) मजबूत आणि सुरक्षित असावी यासाठी जबाबदार असतो.

   - इमारतीच्या स्ट्रक्चरल डिझाइनमध्ये बीम, कॉलम, स्लॅब यांचे मोजमाप आणि सुरक्षिततेचे मापदंड निश्चित करणे.

   - विविध लोड्स (जसे की डेड लोड, लाईव्ह लोड, विंड लोड, सिस्मिक लोड) यांचा विचार करून स्ट्रक्चरल डिझाइन तयार करणे.

3. Site Engineer (साईट इंजिनियर):

   - बांधकाम साइटवर प्रत्यक्ष कामाचे व्यवस्थापन आणि देखरेख करणे.

   - काम वेळेवर आणि दर्जेदाररित्या पूर्ण होईल याची खात्री करणे.

   - कामाच्या प्रगतीचा अहवाल तयार करणे, कंत्राटदार आणि कामगारांशी समन्वय साधणे.

   - साइटवरील बांधकाम नियमानुसार चालू आहे याची खात्री करणे.

4. Contractor (कंत्राटदार):

   - संपूर्ण बांधकामाची जबाबदारी घेतो, जसे की कामगारांची व्यवस्था, बांधकाम साहित्याची खरेदी, आणि वेळेवर काम पूर्ण करणे.

   - डिझाइननुसार बांधकाम करणे आणि साईट इंजिनियरशी समन्वय साधणे.

   - कामाचे बजेट आणि खर्चाचे व्यवस्थापन करणे.

5. Material Supplier (साहित्य पुरवठादार):

   - बांधकामासाठी लागणारे साहित्य जसे की सिमेंट, वाळू, सळई (Steel), विटा, कच्चा माल इत्यादी पुरवतो.

   - बांधकाम साहित्य वेळेवर आणि योग्य दर्जाचे पुरवणे.

   - कंत्राटदार किंवा साइट इंजिनियरशी संपर्क साधून मालाचा पुरवठा करणे.


या सगळ्यांचे समन्वय आणि कार्यक्षमता इमारतीच्या गुणवत्तेवर आणि बांधकामाच्या यशस्वीतेवर प्रभाव टाकते.

Friday, September 20, 2024

Footing/ Foundation चे प्रकार

 नमस्कार मंडळी, 

Civil Engineering IIT, Pune मध्ये Lecture घेत असताना बरेच वेळा मला विध्यार्थ्यांकडून Footing आणि Foundation बद्दल तुमच्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल अशी विनंती आली. 

चला तर मग आज याच विषयावर चर्चा करूया. 

मित्रांनो आपण सर्व जेव्हा आपल्या पायाकडे पाहतो तेव्हा असे दिसते कि आपला पंजा हा इतर पायापेक्षा आकाराने मोठा आणि पसरत आहे. तर हे असे का असावे. तर आपला भर हा सर्व ठिकाणी व्यवस्थित पसरला जावा आणि आपले पाय/ हाडे दुखू नयेत.

तसेच काहीसे आपल्या इमारतीच्या बाबतीत सुद्धा असते. तर आज आपण इमारतीसाठीच्या पायाचे प्रकार (Footing/Foundation) समजून  घेऊ.  

१. Isolated footing 

या प्रकारचे footing हे छोट्या इमारतीसाठी तसेच जेव्हा एका footing वर एकाच column चा लोड येणार असेल अश्या ठिकाणी वापरतात. या प्रकारच्या footing ला rib किंवा pad footing असे हि म्हणतात. Isolated footing आपण खालील प्रकारच्या आकारामध्ये बनवू शकतो. 



2. Strip Footing


या प्रकारचे footing हे लहान ते मध्यम आकाराच्या इमारतीसाठी वापरले जाते. या footing प्रकारामध्ये संपूर्ण मुख्य भिंतींच्या खाली footing दिलेले असते. जेव्हा मातीची दाब सहन करण्याची क्षमता चान्ली असेल तेव्हा या प्रकारचे footing वापरतात. या प्रकारचे footing बांधत असताना जमिनी मध्ये आवश्यक त्या मापाची चार मारून त्यामध्ये concrete करतात. 

३. Combined Footing 

जेव्हा दोन Column खूप जवळ जवळ असतील तर दोन्हीचे मिळून एकच footing केले जाते त्यास Combined Footing म्हणतात. इमारतीच्या सीमेलगत असणारे column काढताना सुद्द्धा याच प्रकारच्या  footing चा जास्तीत जास्त वापर होताना दिसतो. 

४. Mat or Raft Foundation

जेव्हा संपूर्ण इमारतीचा भर जमिनीवर एकत्र जावा असे अपेक्षित असते, तेव्हा अश्या प्रकारचे footing वापरतात. हे फूरिंग जेव्हा जमिनीची दाब सहन करण्याची क्षमता कमी असेल आणि जमिनीमध्ये पाण्याची पातळी खूप वर असेल अश्या ठिकाणी लाभदायक आहे. 

५. Step Foundation
जेव्हा एकादे बांधकाम हे उताराच्या जमिनीवर असते तेव्हा त्या बांधकामाला आधार देण्यासाठी हे अश्या प्रकारचे Foundation वापरतात. 

Monday, September 16, 2024

आज आपण crush sand चे फायदे बघणार आहोत.

 घर बांधणाऱ्या प्रत्येकासाठी!!

आपण करत असलेल्या कामाला उत्तम प्रतिसाद मिळाला की किती छान वाटतं ना!!!☺️☺️

कोणी कॉमेंट मधून, कोणी फोन करून ,तर कोणी प्रत्यक्ष भेटायला येऊन Civil engineering IIT करत असलेल्या कामाची दाद दिली. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.🙏🏻🙏🏻🙏🏻

खरंच कोणत्याही नात्यातलं संवाद किती महत्त्वाचा असतो ना. मग ते नातं नवरा-बायकोचं असो, मित्र-मैत्रिणीच असो किंवा कंपनी आणि ग्राहकांच.  हो!! हो!! बरोबरच वाचलत तुम्ही "कंपनी  आणि ग्राहकाचे नाते". असे नाते सुद्धा असते बरं.🙂🙂हे नात कायम सदाफुली सारखं टवटवीत राहावं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो.

 आपल्या मधले संवाद आता सुरू झाले आहेत. तुम्हाला कोणती माहिती हवी आहे तुम्ही स्वतः सांगाताहात. सुजाण होत आहात. त्यामुळे मी करत असलेल काम करताना मला अजून हुरूप येत आहे. 

घर बांधणाऱ्या प्रत्येकाला कधी काही समजत नसेल, काही माहिती हवी असेल, काही शंका असतील, तर सरळ कमेंट करा आणि कळवा तुमच्या शंकांचं निरसन करायचा प्रयत्न आम्ही नक्की करू आणि आपलं नातं अजून स्ट्रॉंग होईल अगदी💪🏻💪🏻 काँक्रिट सारखं😊🤞🏻.

त्या सोबतच तुम्ही Civil engineering IIT च्या Instagram Page वर जाऊन सुद्धा तुमच्या  ज्ञानात भर घालू शकता. 

आपण वेगवेगळ्या लेखामधून बांधकाम विषयक माहिती घेत असतो तर आज आपण crush sand चे फायदे बघणार आहोत. त्यामुळे काय होईल तुमचे मतपरिवर्न होऊन घर बांधकामाचा खर्च कमी होईल आणि शिवाय घर ही मजबूत बनेल.

माझ्या Youtube Channel ला Subscribe करून सुद्धा तुम्ही बांधकाम क्षेत्रातील नवीन नवीन माहिती मिळवू शकाल. 

🔸Crush Sand चे फायदे.

१.सर्वात महत्वाचा फायदा crush sand ही इकोफ्रेंडली आहे

२.Crush sand ही काँक्रिट मधील सर्व घटकतत्वे वेगळी होण्यापासून, भूंगिर तयार होण्यापासून, voids (पोकळी)  येण्यापासून रोखते आणि काँक्रिट ला उच्च प्रतीचा टिकाऊपणा आणि ताकद देते.

३. Crush Sand ही मशीन मधून तयार होत असल्याने सर्व पार्टिकल्स एक समान असतात. त्यामुळे परत परत चाळून घ्यायची गरज पडत नाही. यामुळे लेबर कॉस्ट, वेळ आणि वेस्टेज या तिन्ही गोष्टी वाचतात.

४. Crush sand मध्ये शंख शिंपले, माती, अल्कली, क्षार गवत यांसारख्या गोष्टी मिक्स नसतात.

५. काँक्रीट आणि मॉर्टर (विट बांधकामात वापरले जाणारे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण) मध्ये उच्च प्रतीची compressive स्ट्रेंथ निर्माण करते.

६. मॉर्टर मध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी करते. त्यामुळे घरांच्या भिंतीमध्ये ओलावा तसेच लिकेज राहत नाही.

७.उच्च प्रतीची ताकद, उच्चप्रतीचे टिकाऊपणा उच्चप्रतीची compressive स्ट्रेंथ असल्यामुळे काँक्रीट मिक्स डिझाईन बनवणे सोपे जाते आणि आपले घर मजबूत बनते.

८. सहज उपलब्ध होते. आणि नदीच्या वाळूच्या तुलनेत स्वस्त मिळते.


आता हे सर्व वरचे मुद्दे वाचून एखाद्या लहान मुलाला जरी विचारले, कोणती वाळू वापरायची? तरी तोही सांगेल की "आपल्या घरासाठी crush sand च वापरायची.

आपले घर आयुष्यमान बनवायचे असेल, लवकर पूर्ण करायचे असेल तर नदीतली रेती पाहिजे हा हट्ट आता सोडून द्या. सुजाण बना.

टीप : crush sand मध्ये तिच्या वजनाच्या १५%पेक्षा जास्त dust असता कामा नये. Crush sand खरेदी करताना ही खबरदारी नक्की घ्या.


Civil engineering IIT

3rd Floor Trios, 

Symphony IT park, Nanded City,

Sinhgad Road. Pune-411041

📳 - 9006 5006 27

🌍 - https://civilengineeringiit.in/


या सोबतच तुम्हाला माझे व्हिडिओ सुद्धा पहायचे असतील तर तुम्ही माझ्या YouTube Channel ला पण Subscribe करू शकता.  

subscribe करणे साठी ☝☝☝☝☝☝ इथे click करा. 

Friday, September 13, 2024

ठेकेदार योग्य दर्जाचे बांधकाम मटेरियल आपल्या घरासाठी वापरत आहे की नाही हे ओळखण्यासाठी...............

प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते कि मी माझ्या कमाईने माझे स्वताचे घर बांधणार जे माझ्या पुढच्या पिढीला पण उपयोगाला येईल. मग आपण आपल्या उत्पन्नाचा काही भाग राखून साठवून एक घर बांधायला हेतो. आणि घर बांधताना आपण ठेकेदार ला काम देतो पण ठेकेदार आपले स्वप्नातले घर चांगल्या पद्धतीने बांधत आहे का नाही? हे कसे तपासणार आणि आपण आपल्या घरासाठी जी वीट वापरणार आहे ती चांगली आहे का हे कसे ओळखणार हे सांगणारा हा आजचा लेख.  

ठेकेदार योग्य दर्जाचे बांधकाम मटेरियल आपल्या घरासाठी वापरत आहे की नाही हे ओळखण्यासाठी Civil Engineering IIT  रोज नवीन लेख तुमच्यासाठी आणत आहे.

आज आपण बघणार आहोत की उत्तम दर्जाचे वीट कशी ओळखावी?

१. वीट जमिनीवरून एक मीटर पेक्षा कमी उंचीवरून खाली फेकल्यास ती तुटता अथवा फुटता कामा नये. असे करताना विट फुटली तर समजावे विटेची ताकद कमी आहे.

२. ओरखडा ओढल्यास त्यावर पांढरे ओरखडे उठल्यास आणि विटेची माती पडत असल्यास समजावे की वीट ही चांगल्या दर्जाची नाही.

या सोबतच तुम्हाला माझे व्हिडिओ सुद्धा पहायचे असतील तर तुम्ही माझ्या YouTube Channel ला पण Subscribe करू शकता.

३. विटेचा रंग हा गडद लालसर तपकिरी असावा. यावरून ती चांगली भाजली गेली आहे असे समजते.

४. विटेवर पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचे डाग असू नये.

५. विटेच्या कडा सरळ व कोपरे काटकोनात असावेत.

६. विटेवर भेगा, तडे अथवा voids असता कामा नये.

७. दोन विटा एकमेकांवर आपटल्यास धातू सारखा खणखणीत आवाज आला पाहिजे. असा आवाज विट नीट भाजली गेली आहे हे दर्शवतो.

८. वीट जर २४तास पाण्यात भिजत ठेवली तर तिच्या वजनाच्या २०%पेक्षा जास्त पाणी शोषून घेवू नये. 

आधील माहिती साठी हा video पण पाहू शकता. 

वरील माहितीच्या आधारे आपण आता चांगल्या दर्जाची वीट नक्कीच ओळखू शकतो. हो ना!!!

या पुढील लेखात आपण चांगल्या प्रकारची वाळू आणि खडी कशी ओळखावी हे समजून घेणार आहोत तत्पूर्वी ही माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला जरुर कळवा आणि आपल्या आप्तेष्टांमध्ये हा लेख नक्की शेअर करा.

अश्याच नवीन नवीन माहितीसाठी  Civil engineering IIT च्या Instagram Handle ला follow करा. 

तसेच आमच्या team सोबत चर्चा करून तुमच्या शंकांचे निरसन करू शकता. 


Civil engineering IIT

3rd Floor Trios, 

Symphony IT park, Nanded City,

Sinhgad Road. Pune-411041

📳 - 9006 5006 27

🌍 - https://civilengineeringiit.in/


या सोबतच तुम्हाला माझे व्हिडिओ सुद्धा पहायचे असतील तर तुम्ही माझ्या YouTube Channel ला पण Subscribe करू शकता.  

subscribe करणे साठी ☝☝☝☝☝☝ इथे click करा. 


काय आहे आरसीसी स्ट्रक्चर?

 घर बांधणाऱ्या प्रत्येकासाठी!!

काय आहे आरसीसी स्ट्रक्चर?

घर बांधायचं म्हटलं की सगळे स्लॅब घर, स्लॅब च घर असे म्हणतात. स्लॅबच घर म्हणजे नक्की काय?

मला सांगा आपल्या शरीराला मजबुती कशामुळे येते??? हाडांमुळे बरोबर ना!!!

अगदी तसेच आपले घरलापण ज्यामुळे मजबुती आलेली असते ते म्हणजे आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर. हा आपल्या घराच्या आतील सांगाडा आहे. उभ्या-आडव्या मेंबर ची फ्रेम सारखी रचना केलेली असते त्यास आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर असे म्हणतात.

आरसीचा फुल फॉर्म आपण या अगोदर वाचला तर आहेच, तरीपण मला पुन्हा एकदा सांगावेसे वाटते, आरसीसी म्हणजे रेनफोर्स्ड काँक्रिट सिमेंट.

यामध्ये फुटिंग, बीम, कॉलम, ग्राउंड बीम, प्लिंथ बीम, स्लॅब असे मेंबर येतात.

🔸फुटिंग- संपूर्ण इमारतीचा भार तोलून धरण्यासाठी जमिनीच्या खाली जे  स्ट्रक्चर उभारले जाते त्याला फुटिंग किंवा foundation  असे म्हणतात.

🔸बीम- काँक्रिट मध्ये बनवलेल्या आडव्या स्ट्रक्चर मेंबरला बीम असे म्हणतात.

🔸कॉलम -काँक्रिट मध्ये बनवलेल्या उभ्या स्ट्रक्चर मेंबरला कॉलम असे म्हणतात.

🔸ग्राउंड बीम- जमिनी लगत घराच्या बाहेरील भिंतीना आधार देण्यासाठी उभारलेल्या आडव्या मेंबरला ग्राउंड बीम असे म्हणतात.

🔸प्लिंथ बीम- जोत्यालगत घराच्या आतील भिंतींना आधार देण्यासाठी जो आडवा मेंबर उभारला जातो त्याला प्लिंथ बीम असे म्हणतात.

🔸स्लॅब- फ्रेम स्ट्रक्चर मध्ये घराच्या छताला स्लॅब असे म्हणतात.

🔸स्लॅब बीम- स्लॅब ला आधार देण्यासाठी स्लॅब च्या खाली जे आडवे मेंबर उभारलेले असतात त्याला स्लॅब बीम असे म्हणतात.

फ्रेम स्ट्रक्चर मध्ये लोड, स्लॅब कडून स्लॅब बीम कडे, स्लॅब बीम कडून कॉलम कडे आणि कॉलम कडून फुटिंगकडे load ट्रान्सफर होतो.


अशा पद्धतीने फ्रेम स्ट्रक्चर उभारले जाते.

आजची माहिती तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय आमच्या पर्यंत जरूर कळवा.  याच्या पुढच्या लेखात आपण भाजकी विट आणि सिमेंट विटा यामधील तफावत बघणार आहोत.

लक्षात ठेवा!!

Hollywood City Fire: Lessons for the Construction Industry

  When Stars Burn Bright, But the City Burns Brighter Hollywood—the glitzy heart of America’s entertainment industry. It’s where celebrities...