प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न असते कि मी माझ्या कमाईने माझे स्वताचे घर बांधणार जे माझ्या पुढच्या पिढीला पण उपयोगाला येईल. मग आपण आपल्या उत्पन्नाचा काही भाग राखून साठवून एक घर बांधायला हेतो. आणि घर बांधताना आपण ठेकेदार ला काम देतो पण ठेकेदार आपले स्वप्नातले घर चांगल्या पद्धतीने बांधत आहे का नाही? हे कसे तपासणार आणि आपण आपल्या घरासाठी जी वीट वापरणार आहे ती चांगली आहे का हे कसे ओळखणार हे सांगणारा हा आजचा लेख.
ठेकेदार योग्य दर्जाचे बांधकाम मटेरियल आपल्या घरासाठी वापरत आहे की नाही हे ओळखण्यासाठी Civil Engineering IIT रोज नवीन लेख तुमच्यासाठी आणत आहे.
आज आपण बघणार आहोत की उत्तम दर्जाचे वीट कशी ओळखावी?
१. वीट जमिनीवरून एक मीटर पेक्षा कमी उंचीवरून खाली फेकल्यास ती तुटता अथवा फुटता कामा नये. असे करताना विट फुटली तर समजावे विटेची ताकद कमी आहे.
२. ओरखडा ओढल्यास त्यावर पांढरे ओरखडे उठल्यास आणि विटेची माती पडत असल्यास समजावे की वीट ही चांगल्या दर्जाची नाही.
३. विटेचा रंग हा गडद लालसर तपकिरी असावा. यावरून ती चांगली भाजली गेली आहे असे समजते.
४. विटेवर पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचे डाग असू नये.
५. विटेच्या कडा सरळ व कोपरे काटकोनात असावेत.
६. विटेवर भेगा, तडे अथवा voids असता कामा नये.
७. दोन विटा एकमेकांवर आपटल्यास धातू सारखा खणखणीत आवाज आला पाहिजे. असा आवाज विट नीट भाजली गेली आहे हे दर्शवतो.
८. वीट जर २४तास पाण्यात भिजत ठेवली तर तिच्या वजनाच्या २०%पेक्षा जास्त पाणी शोषून घेवू नये.
आधील माहिती साठी हा video पण पाहू शकता.
वरील माहितीच्या आधारे आपण आता चांगल्या दर्जाची वीट नक्कीच ओळखू शकतो. हो ना!!!
या पुढील लेखात आपण चांगल्या प्रकारची वाळू आणि खडी कशी ओळखावी हे समजून घेणार आहोत तत्पूर्वी ही माहिती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला जरुर कळवा आणि आपल्या आप्तेष्टांमध्ये हा लेख नक्की शेअर करा.
अश्याच नवीन नवीन माहितीसाठी Civil engineering IIT च्या Instagram Handle ला follow करा.
तसेच आमच्या team सोबत चर्चा करून तुमच्या शंकांचे निरसन करू शकता.
3rd Floor Trios,
Symphony IT park, Nanded City,
Sinhgad Road. Pune-411041
📳 - 9006 5006 27
🌍 - https://civilengineeringiit.in/
subscribe करणे साठी ☝☝☝☝☝☝ इथे click करा.