घर बांधणाऱ्या प्रत्येकासाठी!!
काय आहे आरसीसी स्ट्रक्चर?
घर बांधायचं म्हटलं की सगळे स्लॅब घर, स्लॅब च घर असे म्हणतात. स्लॅबच घर म्हणजे नक्की काय?
मला सांगा आपल्या शरीराला मजबुती कशामुळे येते??? हाडांमुळे बरोबर ना!!!
अगदी तसेच आपले घरलापण ज्यामुळे मजबुती आलेली असते ते म्हणजे आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर. हा आपल्या घराच्या आतील सांगाडा आहे. उभ्या-आडव्या मेंबर ची फ्रेम सारखी रचना केलेली असते त्यास आरसीसी फ्रेम स्ट्रक्चर असे म्हणतात.
आरसीचा फुल फॉर्म आपण या अगोदर वाचला तर आहेच, तरीपण मला पुन्हा एकदा सांगावेसे वाटते, आरसीसी म्हणजे रेनफोर्स्ड काँक्रिट सिमेंट.
यामध्ये फुटिंग, बीम, कॉलम, ग्राउंड बीम, प्लिंथ बीम, स्लॅब असे मेंबर येतात.
🔸फुटिंग- संपूर्ण इमारतीचा भार तोलून धरण्यासाठी जमिनीच्या खाली जे स्ट्रक्चर उभारले जाते त्याला फुटिंग किंवा foundation असे म्हणतात.
🔸बीम- काँक्रिट मध्ये बनवलेल्या आडव्या स्ट्रक्चर मेंबरला बीम असे म्हणतात.
🔸कॉलम -काँक्रिट मध्ये बनवलेल्या उभ्या स्ट्रक्चर मेंबरला कॉलम असे म्हणतात.
🔸ग्राउंड बीम- जमिनी लगत घराच्या बाहेरील भिंतीना आधार देण्यासाठी उभारलेल्या आडव्या मेंबरला ग्राउंड बीम असे म्हणतात.
🔸प्लिंथ बीम- जोत्यालगत घराच्या आतील भिंतींना आधार देण्यासाठी जो आडवा मेंबर उभारला जातो त्याला प्लिंथ बीम असे म्हणतात.
🔸स्लॅब- फ्रेम स्ट्रक्चर मध्ये घराच्या छताला स्लॅब असे म्हणतात.
🔸स्लॅब बीम- स्लॅब ला आधार देण्यासाठी स्लॅब च्या खाली जे आडवे मेंबर उभारलेले असतात त्याला स्लॅब बीम असे म्हणतात.
फ्रेम स्ट्रक्चर मध्ये लोड, स्लॅब कडून स्लॅब बीम कडे, स्लॅब बीम कडून कॉलम कडे आणि कॉलम कडून फुटिंगकडे load ट्रान्सफर होतो.
अशा पद्धतीने फ्रेम स्ट्रक्चर उभारले जाते.
आजची माहिती तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय आमच्या पर्यंत जरूर कळवा. याच्या पुढच्या लेखात आपण भाजकी विट आणि सिमेंट विटा यामधील तफावत बघणार आहोत.
लक्षात ठेवा!!