घर बांधणाऱ्या प्रत्येकासाठी!!
आपण करत असलेल्या कामाला उत्तम प्रतिसाद मिळाला की किती छान वाटतं ना!!!☺️☺️
कोणी कॉमेंट मधून, कोणी फोन करून ,तर कोणी प्रत्यक्ष भेटायला येऊन Civil engineering IIT करत असलेल्या कामाची दाद दिली. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंच कोणत्याही नात्यातलं संवाद किती महत्त्वाचा असतो ना. मग ते नातं नवरा-बायकोचं असो, मित्र-मैत्रिणीच असो किंवा कंपनी आणि ग्राहकांच. हो!! हो!! बरोबरच वाचलत तुम्ही "कंपनी आणि ग्राहकाचे नाते". असे नाते सुद्धा असते बरं.🙂🙂हे नात कायम सदाफुली सारखं टवटवीत राहावं यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो.
आपल्या मधले संवाद आता सुरू झाले आहेत. तुम्हाला कोणती माहिती हवी आहे तुम्ही स्वतः सांगाताहात. सुजाण होत आहात. त्यामुळे मी करत असलेल काम करताना मला अजून हुरूप येत आहे.
घर बांधणाऱ्या प्रत्येकाला कधी काही समजत नसेल, काही माहिती हवी असेल, काही शंका असतील, तर सरळ कमेंट करा आणि कळवा तुमच्या शंकांचं निरसन करायचा प्रयत्न आम्ही नक्की करू आणि आपलं नातं अजून स्ट्रॉंग होईल अगदी💪🏻💪🏻 काँक्रिट सारखं😊🤞🏻.
त्या सोबतच तुम्ही Civil engineering IIT च्या Instagram Page वर जाऊन सुद्धा तुमच्या ज्ञानात भर घालू शकता.
आपण वेगवेगळ्या लेखामधून बांधकाम विषयक माहिती घेत असतो तर आज आपण crush sand चे फायदे बघणार आहोत. त्यामुळे काय होईल तुमचे मतपरिवर्न होऊन घर बांधकामाचा खर्च कमी होईल आणि शिवाय घर ही मजबूत बनेल.
माझ्या Youtube Channel ला Subscribe करून सुद्धा तुम्ही बांधकाम क्षेत्रातील नवीन नवीन माहिती मिळवू शकाल.
🔸Crush Sand चे फायदे.
१.सर्वात महत्वाचा फायदा crush sand ही इकोफ्रेंडली आहे
२.Crush sand ही काँक्रिट मधील सर्व घटकतत्वे वेगळी होण्यापासून, भूंगिर तयार होण्यापासून, voids (पोकळी) येण्यापासून रोखते आणि काँक्रिट ला उच्च प्रतीचा टिकाऊपणा आणि ताकद देते.
३. Crush Sand ही मशीन मधून तयार होत असल्याने सर्व पार्टिकल्स एक समान असतात. त्यामुळे परत परत चाळून घ्यायची गरज पडत नाही. यामुळे लेबर कॉस्ट, वेळ आणि वेस्टेज या तिन्ही गोष्टी वाचतात.
४. Crush sand मध्ये शंख शिंपले, माती, अल्कली, क्षार गवत यांसारख्या गोष्टी मिक्स नसतात.
५. काँक्रीट आणि मॉर्टर (विट बांधकामात वापरले जाणारे सिमेंट आणि वाळूचे मिश्रण) मध्ये उच्च प्रतीची compressive स्ट्रेंथ निर्माण करते.
६. मॉर्टर मध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी करते. त्यामुळे घरांच्या भिंतीमध्ये ओलावा तसेच लिकेज राहत नाही.
७.उच्च प्रतीची ताकद, उच्चप्रतीचे टिकाऊपणा उच्चप्रतीची compressive स्ट्रेंथ असल्यामुळे काँक्रीट मिक्स डिझाईन बनवणे सोपे जाते आणि आपले घर मजबूत बनते.
८. सहज उपलब्ध होते. आणि नदीच्या वाळूच्या तुलनेत स्वस्त मिळते.
आता हे सर्व वरचे मुद्दे वाचून एखाद्या लहान मुलाला जरी विचारले, कोणती वाळू वापरायची? तरी तोही सांगेल की "आपल्या घरासाठी crush sand च वापरायची.
आपले घर आयुष्यमान बनवायचे असेल, लवकर पूर्ण करायचे असेल तर नदीतली रेती पाहिजे हा हट्ट आता सोडून द्या. सुजाण बना.
टीप : crush sand मध्ये तिच्या वजनाच्या १५%पेक्षा जास्त dust असता कामा नये. Crush sand खरेदी करताना ही खबरदारी नक्की घ्या.
Civil engineering IIT
3rd Floor Trios,
Symphony IT park, Nanded City,
Sinhgad Road. Pune-411041
📳 - 9006 5006 27
🌍 - https://civilengineeringiit.in/
या सोबतच तुम्हाला माझे व्हिडिओ सुद्धा पहायचे असतील तर तुम्ही माझ्या YouTube Channel ला पण Subscribe करू शकता.
subscribe करणे साठी ☝☝☝☝☝☝ इथे click करा.