१. फुटिंगच्या असणाऱ्या चारी बाजू साईजपेक्षा, खड्ड्याची लांबी आणि रुंदी किमान एक एक फूट जास्त खोदलेली असावी.
२. खडकाळ जमिनीमध्ये खड्डे खोदत असतेवेळी खड्ड्याच्या तळाची लेवल खोलगट असेल तर, त्यामध्ये कोणतीच पोकळ भर करू नये. कारण त्या ठिकाणावर बिल्डिंगचा भार पेलणारा पिलर उभा राहणार असतो.
*बांधकाम बद्दल अजून माहिती घेनेसाठी माझ्या YouTube ला Subscribe करू शकता. *
३. ९० अंशामध्ये (काटकोन) खात्रीशीर मोजमाप केले आहे का याची खात्री वारंवार करून घ्यावी.
४. तुमचा कॉन्ट्रॅक्टर तीन, चार आणि तिरकस व्यास ५ फूट असा काटकोन तपासात असेल तर त्याला विरोध करा. काटकोन करतेवेळी अगदी केसा इतक्या जाडीची चूक सुद्धा ५० फुट लांबी किंवा रुंदीमध्ये २ इंचाचा चुकीचा काटकोन दर्शवू शकते. तेव्हा शक्य तितक्या अधिक लांबीचा काटकोन भरण्याच्या अट्टहास करावा.
५. ग्राहकांनी फुटिंगच्या PCC साठी अधिक सिमेंट वापराचा हट्ट करू नये, कारण खड्यांची लेवल व्यवस्थित नसते म्हणून pcc करावी लागते.
६. pcc झाले नंतर कॉलम मार्क व्यवस्थित झाल्याची खात्री करून घ्यावी, त्यामुळे अचूक कामाची खात्री होईल.
७. फुटिंगच्या सळया rcc डिझाईन प्रमाणे बरोबर बांधून त्या बारला एल आकाराचे शेप केलेत. याची खात्री करून घ्यावी.
८. rcc डिझाईन प्रमाणे कॉलम नंबर पाहून कॉलम आणि फुटिंग साईज योग्य मापे असल्याची खात्री करून घ्यावी.
९. फुटिंग जाळी pcc वर ठेवणेत आली असेल तर कव्हर ब्लॉक जाळीच्या खाली टाकण्यास विनंती करावी.
१०. फुटिंगच्या साइजप्रमाणे, (चारी बाजू ) लांबी x रुंदी x उंचीचे शटरिंग केलेले असावे. फुटिंगचे शटरिंग म्हणून विटा आणि दगडांचा वापर केलेला असेल तर ती सर्वात मोठी चूक आहे असे समजावे.
बांधकामा बद्दलची माहिती व शेअर केलेला अनुभव, हा जर तुमचा हि अनुभव असेल अथवा फसवणूक होवू नये. असे जर का वाटत असेल तर तुम्ही आम्हला फोन अधिकृत प्रशिक्षण घेऊ शकाल.