फुटिंग मध्ये ग्राहकांची फसवणूक

होण्यामागची कारणे काय ?
👉आपली फसवणूक आपल्या डोळ्यांदेखत
होतेय तरीही ग्राहकाला याचा थांगपत्ता लागत
नाही. असं का होतं ?

--------©️खाली अजून खूप महत्वाचे आहे --------

📎कारणं -

१. कॉन्ट्रॅक्टर कसा निवडावा याबद्दल माहित नसणे.

२. कमी दर घेणारा कॉन्ट्रॅक्टर निवडणे.

३. आर्किटेक्टकडून सर्वप्रकारचे प्लॅन न करणे.

४. RCC डिझाईन न बनवणे.

५. कॉन्ट्रॅक्टर म्हणेल तसं त्याच्या हा मध्ये हा मिळवणे.

६. फुटिंग मधील सळईची जाडी व दोन सळईच्या मधील अंतर माहित नसणे.

७. फुटिंगच्या, लांबी x रुंदी x उंची माहित नसणे.

८. फुटिंग पेक्षा स्लॅब किती जाडीचा भरणार ? आशा प्रश्नांना महत्व देणे ?

९. काँक्रीट कोणत्या ग्रेडचे करणार ? याउलट सिमेंट कोणत्या कंपनीचे आणि कोणत्या ग्रेडचे वापरणार ? आशा फालतू प्रश्नांची विचारणा करणे.

📌- ग्राहक तेव्हाच फसले जातात, जेव्हा त्यांच्या कडे वरील ९ प्रकारांमधील अनुभव त्यांच्या सोबत नसतात आणि कॉन्ट्रॅक्टर नेमकं तेच हेरून ग्राहकांनाचा गैरफायदा उचलतात आणि म्हणूनच ग्राहकांच्या डोळ्यादेखत केलेली फसवणूक हि ग्राहकांच्या लक्ष्यात येत नाही.
जसा वाळवीचा किडा लाकडाला आतून पोखरतो, अगदी तसेच हे कॉन्ट्रॅक्टर तुमच्या नवीन घराला आतून पोकरण्याची कामं करतात.

👥बांधकामा बद्दलची माहिती व शेअर केलेला अनुभव, हा जर तुमचा हि अनुभव असेल अथवा फसवणूक होवू नये. असे जर का वाटत असेल तर तुम्ही आम्हला फोन करून ऑफिसला भेट देवू शकता...
GB आणि PB एकत्र कधी आणि कोणत्या
ठिकाणी घेणे गरजेचे आहे ?

------------Yash Vastu©----------

✔- GB आणि PB यावेळी एकत्र घ्यावेत...

१. जमीन खडकाळ आहे परंतु जमिनीला
खूप चढ उतार आहे तेव्हा.

२. पार्किंग एरिया असल्यास, कारण -
सर्व कॉलम टाय करण्यासाठी सर्व बीम
एका वेळी घ्यावे लागतात. जरी त्या बीमवर
लोड नसला तरी.

३. बांधकाम मालक दगडी फॉऊंडेशन बांधण्यासाठी
हट्ट करत असेल तेव्हा GB चा PB करावा, RCC
सल्लागार यांचे सल्ल्याने, कारण जेव्हा GB डिझाईन
केला जातो तेव्हा त्या बीमवर येणाऱ्या लोड नुसार
बीम साईज आणि सळईची जाडी जास्त प्रमाणात
असते म्हणून GB हा PB मध्ये कन्व्हर्ट होईल तेव्हा
बीम साईज आणि सळई कमी होण्याची शक्यता
आहे. असं केल्याने तुमची निश्चितच आर्थिक बचत होईल.

४. starta फार कठीण आहे आणि वरती आहे.
तेव्हा तुम्हाला वाटतं GB आणि PB एकत्र केले
तर उत्तम राहील तेव्हा देखील RCC सल्लागार
यांचे सल्ल्याने तुम्ही GB चे PB करू शकता
आणि PB च्या खाली ९ इंच जाडीचे वीट
बांधकामसुद्धा करू शकता.

------------Yash Vastu©----------

👉 अनेकदा ग्राहक फॉऊंडेशनसाठी दगडी
बांधकाम करा हा हट्ट करतात, तेव्हा आपण
RCC बांधकाम करण्याचा निर्णय घेतो, परंतु
PB किंवा GB हा बांधकामावर केला जातो,
तेव्हा त्यावर जाणारा वरील सर्व लोड हा कॉलम
वर ट्रान्सफर होतो, बीमच्या खाली दगडी
बांधकाम करा अथवा सोन्याच्या विटा वापरा,
त्याची काही एक परिणाम RCC स्ट्रक्चरवर
होत नसतो. यामुळे मालकाचे अंध समाधान
होवू शकते आणि जादा आर्थिक झळ लागू शकते ...

👉जर आपले बांधकाम दोन बांधकामाच्या मधोमध
करावे लागणार आहे किंवा गावठाणात एकमेकाला
खेटून बांधकाम करावे लागत असल्यास GB हा
जास्तीत जास्त खोलीवर टाकण्याचा प्रयत्न करा.
अथवा थोडे जास्त खोलीवरून जमीन लेव्हल
पर्यंत विट बांधकाम किंवा दगडी बांधकाम
करून घ्यावे, असे केल्याने तुमच्या जमिनीमध्ये
केलेला भरावा बाजूवाल्याने जेव्हा कधी त्यांच्या
नवीन बांधकामासाठी पाय खोदाई केली तर
आत मधला भरावा कोसळणार नाही आणि
फ्लोरिंग खाली पोकळी होण्यापासून बचाव होईल.

✨ टीप : कॉलम टाय करण्यासाठी कधी कधी
तिरके बीम डिझाईन करावे लागतात.
याचा अर्थ इंजिनिअर चुकीचे काम करू

पाहतो, असे नाही. 

You also have the option to peruse this.