कॉन्ट्रॅक्टर, फाऊंडेशनमध्ये करू शकतो ७ भयंकर चुका.


१. फुटिंगसाठी चारी बाजू शटरिंग न करणे.
२. फुटिंग जाळी खाली कव्हर ब्लॉक न लावणे.
३. फुटिंगच्या जाळ्यांना L न मारणे.
४. शटरिंग मटेरीअल आणि लेबरचा खर्च वाचावण्यासाठी फुटिंगच्या साईटला विटांचा वापर करणे.
५. जसे खड्डे खोदले गेले तसेच काँक्रीट करणे.
६. फुटिंगची जाडी १.५ फूट असेल तर ९ इंच नाहीतर १ फूट भरणे.
७. साईट लावून फुटिंग न भरल्याने फुटिंगचे कॉंक्रिट कमी जाडीचे करने.

फायदे आणि तोटे -

१. विथ मटेरियल साईटमध्ये काँट्रॅक्टरला दोनी बाजूने अधिक फायदा करता येतो. तो म्हणजे वरील ७ गोष्टी मध्ये लेबर आणि मटेरियलची बचत, याउलट वास्तू मालकाचा होणार तोटा म्हणजे आजीवन आणि टिकावू वास्तू निर्मितीसाठी आयुष्यभरासाठी मुखले जाणे.

२. लेबर कॉन्ट्रॅक्टर हा मालकाचे मटेरियल वाचवल्याचा दिखाऊ करतो, पण हा बनावट दिखावा मालकाच्या अंगलट आल्याशिवाय राहत नाही. कारण त्याला मटेरियल वाचवून लेबरच्या पगाराची बचत करायची असते.

एक मालक म्हणून तुम्ही तुमची साईट काँट्रॅक्टरला विथ मटेरियल किंवा लेबर कॉन्ट्रॅक्ट म्हणून जर सोपवली असेल तर, दोनी बाजूने तुम्ही फसले जाणारच.

याचे एकमेव कारण, पैसे वाचवण्याचा विचार आणि स्वस्तात काम करून देणारा कॉन्ट्रॅक्टर.. तुम्ही दोघेही बरोबर आहात आणि समविचारी देखील. घर मालकाला जे हवंय तेच काँट्रॅक्टरला सुद्धा. मालकाचा मोह पैसे वाचवण्यात असतो आणि काँट्रॅक्टरला काम मिळवण्यात. कमी पैश्यात स्वीकारलेल्या कामामधले असे अनेक गुपित कॉन्ट्रॅक्टर मालकांना कधीच सांगत नाही त्याच एकमेव कारण तुम्ही दिलेला कमी दर...

शेवटी एकच प्रश्न उद्भवतो, आता करायचं काय ?

You also have the option to peruse this.