काँक्रिटमध्ये सिमेंट, वाळू, खडी आणि पाण्याचे महत्त्व

 काँक्रिट हे बांधकाम क्षेत्रातील सर्वाधिक वापरले जाणारे आणि महत्त्वाचे बांधकाम साहित्य आहे. यामध्ये सिमेंट, वाळू, खडी (अ‍ॅग्रीगेट) आणि पाणी यांचा समावेश असतो. प्रत्येक घटकाचे काँक्रिटच्या गुणवत्तेसाठी विशिष्ट महत्त्व आहे. चला, या घटकांचे महत्त्व समजून घेऊया.

1. सिमेंट:

सिमेंट हे काँक्रिटचे मुख्य घटक आहे. हे एक बांधकाम साहित्य आहे जे पाण्याच्या संपर्कात आल्यावर घट्ट होऊन कठीण होते. सिमेंटचे कार्य काँक्रिटच्या इतर घटकांना एकत्र बांधून ठेवणे आहे. उच्च दर्जाचे सिमेंट वापरल्याने काँक्रिटचे सामर्थ्य आणि टिकाऊपणा वाढतो.
उदाहरणार्थ, OPC (ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट) आणि PPC (पोर्टलँड पॉझोलाना सिमेंट) हे सामान्यत: वापरले जाणारे सिमेंटचे प्रकार आहेत.

2. वाळू:

वाळू ही काँक्रिटमध्ये वापरली जाणारी सूक्ष्म अ‍ॅग्रीगेट आहे. वाळूचा उपयोग सिमेंट आणि खडी यांना एकत्र घट्ट बांधून ठेवण्यासाठी केला जातो. वाळूची गुणवत्ता चांगली असल्यास काँक्रिटची मजबुतीही चांगली होते. वाळूचे कण एकसमान आणि स्वच्छ असावेत. साधारणतः नदीची वाळू अधिक चांगली मानली जाते, कारण त्यात कमी धूळ आणि माती असते.

3. खडी (अ‍ॅग्रीगेट):

खडी म्हणजे काँक्रिटमध्ये वापरली जाणारी मोठी कण सामग्री आहे. ती काँक्रिटला मजबुती प्रदान करते आणि कमी होणारी जागा भरून काँक्रिटच्या एकसमानतेला मदत करते. खडीचे कण विविध आकारांत उपलब्ध असतात, जसे की 10 मिमी, 20 मिमी, आणि 40 मिमी. खडीची योग्य प्रमाणात आणि योग्य आकारात निवड केल्यास काँक्रिटच्या संकुचन आणि विस्ताराचे गुणधर्म संतुलित ठेवले जातात.

4. पाणी:

पाणी हे काँक्रिटमध्ये सिमेंटशी प्रतिक्रिया करण्यासाठी (हायड्रेशन प्रोसेस) आवश्यक असते. पाण्याच्या प्रमाणामुळे काँक्रिटचा घट्टपणा आणि कार्यक्षमता ठरते. अधिक पाणी वापरल्यास काँक्रिट कमजोर होऊ शकते, तर कमी पाणी वापरल्यास ते घनता टिकवण्यास कठीण होईल. यासाठी योग्य प्रमाणात पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे. स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पाणी वापरणे हे देखील महत्त्वाचे आहे.

निष्कर्ष:

काँक्रिटच्या गुणवत्तेसाठी सिमेंट, वाळू, खडी आणि पाणी या चार घटकांचा संतुलित वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य गुणवत्तेचे साहित्य वापरल्यास बांधकाम मजबूत, टिकाऊ आणि दीर्घकाळ टिकणारे होते. त्यामुळे, प्रत्येक घटकाच्या निवडीमध्ये आणि त्यांच्या प्रमाणाच्या निर्धारणात अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे.

 फुटिंग मध्ये ग्राहकांची फसवणूक

होण्यामागची कारणे काय ?
👉आपली फसवणूक आपल्या डोळ्यांदेखत
होतेय तरीही ग्राहकाला याचा थांगपत्ता लागत
नाही. असं का होतं ?

--------©️खाली अजून खूप महत्वाचे आहे --------

📎कारणं -

१. कॉन्ट्रॅक्टर कसा निवडावा याबद्दल माहित नसणे.

२. कमी दर घेणारा कॉन्ट्रॅक्टर निवडणे.

३. आर्किटेक्टकडून सर्वप्रकारचे प्लॅन न करणे.

४. RCC डिझाईन न बनवणे.

५. कॉन्ट्रॅक्टर म्हणेल तसं त्याच्या हा मध्ये हा मिळवणे.

६. फुटिंग मधील सळईची जाडी व दोन सळईच्या मधील अंतर माहित नसणे.

७. फुटिंगच्या, लांबी x रुंदी x उंची माहित नसणे.

८. फुटिंग पेक्षा स्लॅब किती जाडीचा भरणार ? आशा प्रश्नांना महत्व देणे ?

९. काँक्रीट कोणत्या ग्रेडचे करणार ? याउलट सिमेंट कोणत्या कंपनीचे आणि कोणत्या ग्रेडचे वापरणार ? आशा फालतू प्रश्नांची विचारणा करणे.

📌- ग्राहक तेव्हाच फसले जातात, जेव्हा त्यांच्या कडे वरील ९ प्रकारांमधील अनुभव त्यांच्या सोबत नसतात आणि कॉन्ट्रॅक्टर नेमकं तेच हेरून ग्राहकांनाचा गैरफायदा उचलतात आणि म्हणूनच ग्राहकांच्या डोळ्यादेखत केलेली फसवणूक हि ग्राहकांच्या लक्ष्यात येत नाही.
जसा वाळवीचा किडा लाकडाला आतून पोखरतो, अगदी तसेच हे कॉन्ट्रॅक्टर तुमच्या नवीन घराला आतून पोकरण्याची कामं करतात.

👥बांधकामा बद्दलची माहिती व शेअर केलेला अनुभव, हा जर तुमचा हि अनुभव असेल अथवा फसवणूक होवू नये. असे जर का वाटत असेल तर तुम्ही आम्हला फोन करून ऑफिसला भेट देवू शकता...
GB आणि PB एकत्र कधी आणि कोणत्या
ठिकाणी घेणे गरजेचे आहे ?

------------Yash Vastu©----------

✔- GB आणि PB यावेळी एकत्र घ्यावेत...

१. जमीन खडकाळ आहे परंतु जमिनीला
खूप चढ उतार आहे तेव्हा.

२. पार्किंग एरिया असल्यास, कारण -
सर्व कॉलम टाय करण्यासाठी सर्व बीम
एका वेळी घ्यावे लागतात. जरी त्या बीमवर
लोड नसला तरी.

३. बांधकाम मालक दगडी फॉऊंडेशन बांधण्यासाठी
हट्ट करत असेल तेव्हा GB चा PB करावा, RCC
सल्लागार यांचे सल्ल्याने, कारण जेव्हा GB डिझाईन
केला जातो तेव्हा त्या बीमवर येणाऱ्या लोड नुसार
बीम साईज आणि सळईची जाडी जास्त प्रमाणात
असते म्हणून GB हा PB मध्ये कन्व्हर्ट होईल तेव्हा
बीम साईज आणि सळई कमी होण्याची शक्यता
आहे. असं केल्याने तुमची निश्चितच आर्थिक बचत होईल.

४. starta फार कठीण आहे आणि वरती आहे.
तेव्हा तुम्हाला वाटतं GB आणि PB एकत्र केले
तर उत्तम राहील तेव्हा देखील RCC सल्लागार
यांचे सल्ल्याने तुम्ही GB चे PB करू शकता
आणि PB च्या खाली ९ इंच जाडीचे वीट
बांधकामसुद्धा करू शकता.

------------Yash Vastu©----------

👉 अनेकदा ग्राहक फॉऊंडेशनसाठी दगडी
बांधकाम करा हा हट्ट करतात, तेव्हा आपण
RCC बांधकाम करण्याचा निर्णय घेतो, परंतु
PB किंवा GB हा बांधकामावर केला जातो,
तेव्हा त्यावर जाणारा वरील सर्व लोड हा कॉलम
वर ट्रान्सफर होतो, बीमच्या खाली दगडी
बांधकाम करा अथवा सोन्याच्या विटा वापरा,
त्याची काही एक परिणाम RCC स्ट्रक्चरवर
होत नसतो. यामुळे मालकाचे अंध समाधान
होवू शकते आणि जादा आर्थिक झळ लागू शकते ...

👉जर आपले बांधकाम दोन बांधकामाच्या मधोमध
करावे लागणार आहे किंवा गावठाणात एकमेकाला
खेटून बांधकाम करावे लागत असल्यास GB हा
जास्तीत जास्त खोलीवर टाकण्याचा प्रयत्न करा.
अथवा थोडे जास्त खोलीवरून जमीन लेव्हल
पर्यंत विट बांधकाम किंवा दगडी बांधकाम
करून घ्यावे, असे केल्याने तुमच्या जमिनीमध्ये
केलेला भरावा बाजूवाल्याने जेव्हा कधी त्यांच्या
नवीन बांधकामासाठी पाय खोदाई केली तर
आत मधला भरावा कोसळणार नाही आणि
फ्लोरिंग खाली पोकळी होण्यापासून बचाव होईल.

✨ टीप : कॉलम टाय करण्यासाठी कधी कधी
तिरके बीम डिझाईन करावे लागतात.
याचा अर्थ इंजिनिअर चुकीचे काम करू

पाहतो, असे नाही.